बेळगाव : चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रोत्साहन फाउंडेशनच्या वतीने समाजातील गरीब गरजूंना मदत देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. प्रोत्साहन फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गंगाप्पा होनगल सभागृहात नुकतीच पार पडली. यावेळी उपस्थित सर्व सदस्यांनी कोरोना काळात चर्मकार समाजातील गरिबांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे संत रोहिदास हरळय्या समाजातील गरीब गरजू कुटुंबांना शिधा किट त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल.
या बैठकीला उपस्थित प्रोत्साहन फाउंडेशनचे अध्यक्ष वासुदेव दोडमनी, मंडळ पोलिस निरीक्षक संतोष कुमार चंदावरी, जीएसटीचे उपायुक्त चंद्रकांत लोकरे, बीएसएनएल डेप्युटी जनरल मॅनेजर मल्लीकार्जुन ताळीकोटी, राणी चन्नम्मा विद्यापीठाचे प्राध्यापक चंद्रकांत वाघमारे, ऑडिट ऑफिसर सागर कित्तूर, चर्मकार समाजाचे नेते रवी शिंदे, हिरालाल चव्हाण, रवी होनगल, सुधाकर जोगळेकर तसेच संतोष होनगल उपस्थित होते.
पोलीस उपायुक्त सदाशिव कट्टीमनी यांनी दहा हजार रुपये, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता भीमराव पवार दहा हजार रुपये, टेक्स्टाईल विभागाचे उपसंचालक वासुदेव दोडमनी दहा हजार रुपये, जीएसटी संचालक चंद्रकांत लोकरे 8000 हजार रुपये, मंडळ पोलीस निरीक्षक संतोष कुमार चंदावरी पाच हजार रुपये यांनी आर्थिक मदत जाहीर केली.
Check Also
भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना
Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …