Tuesday , March 3 2026
Breaking News

बेळगाव अनलॉक

Spread the love

बेळगाव : महिन्यापासून बंद असलेल्या बेळगावचा प्रवास आता ‘अनलॉक’च्या दिशेने सुरु होणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील नागरिक आणि व्यापारी वर्गासाठी अत्यंत आनंदाची तसेच महत्वाची बातमी आहे. कोविड रुग्णांच्या कमी होणाऱ्या संख्येमुळे अखेर कोविड निर्बंध आणखी शिथिल झाले असून 21 जूनपासून 5 जुलैपर्यंत त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. बेळगाव जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हीटी रेट 5% पेक्षा कमी आला आहे, त्यामुळे एप्रिलमध्ये लागू केलेले निर्बंध शिथिल करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
कर्नाटकातील एकमेव म्हैसूर जिल्ह्यात अनलाॅक नाही
सोमवार (21 जून) पासून बेळगाव शहरातील दुकाने सकाळी 6 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. अखेर महिन्यानंतर व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सोमवारपासून काही वेळ का होईना दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली आहे. अत्यावश्यक वर्गातील दुकानांची वेळ आता वाढविण्यात आली आहे. किराणा, भाजीपाला, दूध आदी अत्यावश्यक सेवेअंतर्गत असणारी दुकानांची वेळ यापुर्वी 10 वाजेपर्यंत होती. आता हि वेळ सोमवारपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *