बेळगाव : दिवसेंदिवस मानवाच्या आहार शैलीत बदलत आहे. बदलत्या युगात आपल्याला आवडते ते चटकदार आहार सेवन करण्यापेक्षा आपल्या शरीराला पोषक असा आहार घेतला पाहिजे. उत्तम आरोग्यासाठी सकस संतुलीत आहार घेण्याची गरज आहे असे आरोग्यासाठी मार्गदर्शन पर व्याख्यानात हॅपी टू हेल्प राजू रोहिनीज वेलनेस सेन्टरचे संचालक राजू घाटेगस्ती यांनी म्हटले आहे.
तारांगण व हॅपी टू हेल्प राजू रोहिनीज वेलनेस सेन्टर आयोजित वटपोर्णिमा सेल्फी स्पर्धेच्या बक्षीस समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
आरोग्याला विघातक कोणते पदार्थ आहेत कोणत्या पदार्थांनी कॅलरीज वाढतात याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
व्यासपीठावर राजू घाटेगस्ती, स्पर्धेचे परीक्षक डी. बी. पाटील, प्रा. सी. एम. गोरल अतिथी म्हणून उपस्थित होते.
तारांगणच्या संचालिका अरूणा गोजे पाटील यांनी प्रास्ताविक केले. तारांगणच्या केंद्र संचालिका स्मिता मेंडके, जयश्री दिवटे, अर्चना पाटील यांनी स्वागत व पाहुण्यांचा परिचय करून दिला.
परीक्षक डी. बी. पाटील यांनी सेल्फी फोटोग्राफी विषयानुसार करावी. स्पर्धेच्या नियमानुसार फोटो ग्राफी करणे गरजेचे आहे. वटपिर्णिमेच्या सेल्फी स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धकांनी वृक्षारोपण केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. वटपोर्णिमा किंवा इतर दिवशी झाडांची रोपण करावी. वटपौर्णिमेला वडाच्या फांदीची पूजा करणेसाठी वृक्षतोड करू नये. त्यामुळे वृक्षांचा ऱ्हास होतो.
प्रा. सी. एम. गोरल यांनी अलीकडे कोरोनाकाळात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. वृक्षारोपणासाठी वड व पिंपळ सारख्या जास्त ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करावी, असे म्हटले. तारांगणच्या माध्यमातून महिलांसाठी राबवले जाणारे विविध उपक्रम स्तुत्य आहेत असे तारांगणच्या कार्याचे कौतुक केले.
सेल्फी स्पर्धेतील विजेते
१) नम्रता तेरणी शास्त्री नगर, प्रथम
२) तेजस्विनी बावडेकर शिवाजी नगर, द्वितीय
३) नयन मंडोळकर शिवाजी नगर, तृतीय
उतेजनार्थ
१) नीतू मजुकर, शहापूर
२) माधवी हिंडलगेकर, टीचर्स कॉलनी
३) सुजाता पाटील वडगाव
४) माहेश्वरी सोमाजीचे कंग्राळी
याना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कवयित्री रोशनी हुंदरे यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी केंद्र संचालिका सविता वेसने, सविता चिल्लाळ, प्रा.मनीषा नाडगोडा, नेत्रा मेणसे उपस्थित होत्या.