
बेळगाव : २७ फेब्रुवारी २०२६ रोजी गुरूवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधनीच्या वतीने कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांमध्ये ‘मराठी माध्यम माझी यशोगाथा’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून बेळगाव मधील प्रसिद्ध उद्योजक दांपत्य सोनाली व जयदीप बिर्जे, युवा उद्योजक दांपत्य अक्षता व राहुल पाटील, तसेच ॲड अक्षता व ओमकार सुतार या मराठी माध्यमात शिकून यशस्वी झालेल्या मान्यवरांच्या सोबत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोनाली व जयदीप बिर्जे यांचा परिचय

बिर्जे दांपत्य हे बेळगाव परिसरातील प्रसिद्ध उद्योजक असून त्यांची लिओ इंजिनियर्स ही कंपनी साखर कारखान्यांची यंत्रसामग्री बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. मराठी युवकांना जर्मनीमध्ये व्यवसाय संधी उपलब्ध व्हावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांच्या पत्नी सोनाली बिर्जे याही उच्चशिक्षित असून त्या लिओ इंजिनियर्सच्या पार्टनर आहेत. नुकत्याच जर्मनी येथे झालेल्या इंडो जर्मन प्रोग्रॅम मध्ये सहभागी होऊन त्यांना भारतातील प्रथितयश उद्योजिका म्हणून नेतृत्व करण्याची संधी मिळाली. तसेच लिओ ग्रुप च्या लर्निग एज्युकेशन ऑर्गनायझेशन च्या प्रमुख व फाऊंडर म्हणून कार्य करत आहेत. हे दोघेही मातृभाषेतून शिक्षणाचे प्रसारक आहेत.
अक्षता व ओमकार सुतार (सीए)

ॲड. अक्षता व ओमकार सुतार हे बेळगाव मधील दांपत्य असून अक्षता यांनी वकीलीची सनद प्राप्त केली आहे. सध्या त्या टॅक्स कन्सल्टंट म्हणून काम पाहत आहेत. तर ओमकार हे सीए आहेत. २०२४ साली त्यांनी बॅकींग क्षेत्रातील सीए ही उच्च पदवी संपादन केली. ते सध्या ऑडीट व टॅक्स कन्सल्टंट म्हणून काम पाहतात. या दोघांचेही शिक्षण मराठी माध्यमातून मराठी विद्यानिकेतन येथे झाले आहे.
अक्षता व राहुल पाटील

राहुल व अक्षता हे युवा उद्योजक असून सारस ही ड्रोन बनविण्याची कंपनी ते चालवतात. भारतीय सैनिकांनी केलेल्या बहुचर्चित अशा ऑपरेशन सिंदूर या लढ्यामध्ये शत्रूंचा शोध घेण्यासाठी राहूल पाटील यांच्या सारस कंपनीचे ड्रोन वापरण्यात आले. दोघांचेही इंजिनिअरिंग चे शिक्षण पूर्ण झाले असून राहुल पाटील यांनी ॲरोनॉटिक्स इंजिनिअरची पदवी प्राप्त केली आहे. दोघांचेही शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून राहुल पाटील हे मराठी विद्यानिकेतन शाळेचे माजी विद्यार्थी आहेत.
हा कार्यक्रम गोगटे रंगमंदिर स्कूल ऑफ कल्चर बेळगाव याठिकाणी सायं. ४.१५ वा आयोजित करण्यात आला आहे.
तरी बेळगाव मधील मराठी प्रेमी भाषिकांनी, पालकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन प्रबोधिनीचे अध्यक्ष श्री. जयंत नार्वेकर व सचिव सुभाष ओऊळकर यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta