Monday , September 21 2026
Breaking News

निपाणीतील धर्मवीर संभाजीराजेंच्या चबुतराच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Spread the love

 

दोन महिन्यापूर्वी पडझड : दुरुस्तीसह पुतळ्यासाठी पाठपुरावा

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील बस स्थानकाजवळील धर्मवीर संभाजी राजे चौक हा शहरातील प्रमुख चौक आहे. या चौकात धर्मवीर संभाजी राजे यांचा पुतळा बसवण्यासाठी स्मारक बांधण्यात आला होता. पण दोन महिन्यापूर्वी त्याला वाहनाची धडक बसल्याने तो कोसळला आहे. पण दोन महिने उलटूनही चबुतऱ्याला दुरुस्तीची प्रतिक्षाच आहे.‌ त्यामुळे चौकाला विद्रुप स्वरूप आले आहे. ठिकाणी नवीन चबुतरा बांधण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात येते.
धर्मवीर संभाजीराजे यांच्या बलिदानाची दखल घेऊन येथील बसस्थानक सर्कलला धर्मवीर संभाजीराजे महाराजांचे नाव देण्यात आले आहे. महाराजांच्या पराक्रमाची प्रेरणा सर्वांना मिळावी, या उद्देशाने या चौकात महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काही वर्षांपूर्वी चबुतरा बांधण्यात आला होता. शिवाय शहरातील काही मंडळीकडून पुतळ्याच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा सुरू आहे. पण अद्याप पुतळा उभारण्यात आलेला नाही. अशातच चबुतऱ्याला वाहनाची धडक बसल्याने त्याची पडझड झाली आहे. आता नवीन चबुतऱ्यासह पुतळ्याच्या उभारणीसाठी लोकप्रतिनिधी आणि इतर पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबत कागदपत्रांचीही जुळवा जुळवा केली जात आहे. त्यामुळे चबुतऱ्यासह धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा उभारणीकडे शहर आणि परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.
——————————————————————-
‘सध्या चबुतऱ्याची पडझड झाली आहे. त्यामुळे नवीन चबुतरा बांधण्यासह धर्मवीर संभाजीराजेंचा पुतळा बसवण्यासाठी शहरातील काही मान्यवरांनी पुढाकार घेतला आहे. सध्या या ठिकाणी हायमास्ट दिव्याचा मोठा खांब असून तो इतरत्र हलविण्यात येणार आहे. त्यानंतर कामाला मंजूर मिळाल्यानंतर चबुतऱ्यासह पुतळा उभारणीचे काम सुरू होणार आहे.’
-संजय सांगावकर, माजी नगरसेवक, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *