Tuesday , March 3 2026
Breaking News

रुग्णांच्या काळजीसोबत स्वतःची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे : मानसोपचार तज्ज्ञ जयलक्ष्मी देसाई

Spread the love

 

संजीवीनी फाउंडेशनतर्फे हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन

बेळगाव : रुग्णांच्या काळजीसोबत स्वतःची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे मत मानसोपचारतज्ज्ञ जयलक्ष्मी देसाई यांनी व्यक्त केले. कॉलेज रोड येथील सीआरएच हॉस्पिटलमध्ये संजीविनी फाउंडेशनच्या वतीने आयोजित पारंपरिक हळदी-कुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
देसाई यांनी हॉस्पिटलमधील महिला कर्मचाऱ्यांना “स्वतःची काळजी (Self-Care)” या विषयावर मार्गदर्शन केले. स्व-काळजीचे महत्त्व, काम आणि वैयक्तिक आरोग्य यामधील संतुलन राखण्याचे उपाय तसेच व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःच्या आरोग्याकडे कसे लक्ष द्यावे, याबाबत त्यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. स्वप्ना महाजन, डॉ. सुचित्रा लाटकर, डॉ. रेश्मा कामटे, डॉ. ज्योती गिणीमुगी तसेच सीआरएच हॉस्पिटलच्या प्रशासक डॉ. रेणुका पाटील उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सविता देगीनाळ यांनी संजीविनी फाउंडेशनचे कार्य, विविध सेवा उपक्रम तसेच हळदी-कुंकू कार्यक्रमाचे उद्दिष्ट व महत्त्व याविषयी माहिती दिली.
प्रमुख पाहुण्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रेश्मा कामटे यांनी मनोगत व्यक्त करताना संजीवीनी फाउंडेशनच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले. संस्थेच्या सामाजिक कार्याला आपला पाठिंबा व सहकार्य कायम राहील, असे त्यांनी नमूद केले.
शेवटी उपस्थित सर्व महिलांसाठी पारंपरिक हळदी-कुंकू समारंभ व भेटवस्तू वितरण करण्यात आले. तसेच वातावरणात अधिक उत्साह निर्माण करण्यासाठी मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले. यावेळी सीआरएच हॉस्पिटलमधील सर्व महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचा समारोप संस्थेच्या प्रशासिका पद्मा औशेकर यांनी आभार प्रदर्शनाने केला, तर सूत्रसंचालन ऋतुजा काटे यांनी केले.
हा कार्यक्रम आनंद, स्नेह आणि पारंपरिक उत्साहाच्या वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *