
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून इंग्रजी शिक्षिका रोहिणी सावंत या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ.सर सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांनी ‘विज्ञान गीत’ सादर केले. यासाठी संगीत शिक्षक सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांनी संगीत साथ दिली. विद्यार्थी हर्ष गावडू पाटील याने विज्ञान शपथ घेतली.
सर सी. व्ही. रामन हे भौतिक शास्त्रज्ञ होते. त्यांनी प्रकाशाच्या वक्रीभवनाच्यासंबंधी संशोधन केले. या संशोधनाला ‘रामन प्रभाव’ या नावाने ओळखले जाते. यांना १९३० साली जगातील सर्वोत्तम असे नोबेल पारितोषिक मिळाले. निसर्गावर व विशेषतः फुलांवर त्यांचे खूप प्रेम होते व त्यांचा समग्र दृष्टिकोनच वैज्ञानिक होता. अशा शब्दात शिक्षिका रोहिणी सावंत यांनी संकलित केलेली माहिती मुलांपर्यंत देण्यात आली.इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षक बी.एम्.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञानावर आधारित भित्तीपत्रके बनवली तसेच विज्ञान विषयातील आकृत्यांवर रांगोळी स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंत घेण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, शिक्षक समन्वयक सविता पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. विज्ञान विषय शिक्षक मंजुषा पाटील, रूपाली हळदणकर, स्नेहल बेळगावकर, नम्रता पाटील, शैला पाटील, शामला चलवेटकर, प्रसाद सावंत, स्नेहल पोटे, धीरजसिंह राजपूत, अटल विभाग प्रमुख श्वेता सुर्वेकर व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta