Monday , September 21 2026
Breaking News

ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांची कॅम्प पोलीस ठाण्याला भेट; पोलीस प्रशासनाकडून ‘जागरूकतेचे’ धडे

Spread the love

 

बेळगाव : विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी आणि वाढत्या वयातील चुकीच्या सवयींना वेळीच पायबंद बसावा, या उद्देशाने कॅम्प येथील ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षक श्री. मनोहर करडी आणि शिक्षक मनोज जाधव यांच्या समवेत स्थानिक कॅम्प पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट दिली. पोलीस प्रशासनाच्या विशेष निमंत्रणावरून आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या कामकाजाची माहिती घेतली. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, जीवनात शिस्तीचे महत्त्व आणि चांगल्या सवयींमुळे भविष्याला कशी योग्य गती मिळते, याचे मोलाचे मार्गदर्शन केले.
सध्याच्या युगात तरुणांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता आणि चुकीच्या मार्गाला लागणारी पिढी, या सामाजिक समस्यांना आळा घालण्यासाठी या जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. अमली पदार्थ, सोशल मीडियाचा अतिवापर आणि गुन्हेगारी प्रवृत्तींपासून दूर राहण्याचे आवाहन पोलिसांनी यावेळी केले. या भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या मनातील पोलिसांबद्दलची भीती दूर होऊन एक विश्वासाचे नाते निर्माण झाले. “विद्यार्थी हे देशाचे सुजाण नागरिक बनावेत,” हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगत शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *