Tuesday , March 3 2026
Breaking News

जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, कार्यवाह सुरेन्द्र देसाई , सहकार्यवाह शिवराज पाटील, डॉ. सुरज शेट्टी व डॉ. हिमा देशपांडे उपस्थित होते.
यावेळी डॉ. शेट्टी यांनी रक्तदाब व मधूमेह याविषयी माहिती देऊन समतोल आहार, नियमित व्यायाम व पुरेशी झोप यासह इतरही दहा उपाय सुचविले व ज्येष्ठ नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले व उपस्थितांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले. सेट्रा केअरतर्फे उपस्थित सभासदांची मधूमेह व रक्तदाब तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. सीमा गुंजाळे, प्रज्योत हिरेमठ व दिप्ती के. यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी अश्विनी पाटील यांनी प्रार्थना सादर केली. तर रविंद्रनाथ जुवळी, विजयमाला पाटील, नारायण कोरडे, आर. जी. कुंभोजकर, डॉ.श्रेयस चौगुले, विजय बांदिवडेकर, प्रभाकर देसाई, विजय वाईगडे यांनी मराठी, हिंदी व कन्नड गाणी सादर केली तर विश्वास धुराजी व पांडुरंग कारकल यांनी आरती सादर केली.
सुरेन्द्र देसाई यांनी स्वागत केले तर आभार शिवराज पाटील यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *