Tuesday , March 3 2026
Breaking News

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहरवासियांनी सण शांततेने साजरा होईल याची काळजी घेण्याबरोबरच पोलीस प्रशासनाच्या मार्गसूचीचे काटेकोर पालन करावे, असे जाहीर आवाहन पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी केले आहे.

होळी व रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयामधून व्हिडिओच्या माध्यमातून पोलिस आयुक्तांनी आज रविवारी उपरोक्त आवाहन केले. आपण उद्या सोमवारी 2 मार्च रोजी होळी सण साजरा करत असून शहरातील सुमारे 329 ठिकाणी होळी कामांन्नाचे दहन केले जाईल. दुसऱ्या दिवशी म्हणजे तीन मार्च रोजी बेळगाव शहरात सुमारे 180 रंगपंचमी साजरी केली जाणार आहे. नागरिकांनी होळी व रंगपंचमीचा सण शांततेने साजरा होईल याची काळजी घ्यावी. सणाच्या काळात शांती, कायदा व सुव्यवस्था हवा तिथे राखण्यासाठी शहर व्याप्ती त सुमारे 1000 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. त्यांच्या मदतीला गृहरक्षक दलाचे 250 जवान नेमले जातील याखेरीज पोलिसांच्या मदतीला (केएसआरपी) कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाच्या (केएसआरपी) 7 तुकड्या आणि 10 सीआर यांच्यासह अग्निशामक दल, एसडीआरएफ सज्ज असणार आहे. पोलीस आयुक्तालय व्याप्तीतील 19 ठिकाणी चेक पोस्ट अर्थात तपासणी नाके कार्यरत राहणार आहेत.

या चेक पोस्टच्या ठिकाणी दारू पिऊन वाहन चालवणे, स्वतः सोबत चाकू, तलवार वगैरे सारखी प्राणघातक शस्त्रे बाळगणे यासारख्या गोष्टींना आळा घालण्यासाठी वाहन चालकांची तपासणी केली जाईल. या व्यतिरिक्त घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी शहराच्या विविध भागांमध्ये 500 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर केला जाईल. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या जोडीला बॉडी -वन कॅमेरा आणि हॅंडीकॅप यांचाही वापर केला जाईल. याबरोबरच सणा दिवशी 8 ड्रोन्सची मदत घेतली जाईल. सध्या पदवी पूर्व परीक्षा सुरू असून शाळा -महाविद्यालयांच्या परीक्षा देखील सुरू आहेत. तेंव्हा शहरवासियांनी कृपया सण कमी आवाजात ध्वनी प्रदूषण न करता साजरा करावा. त्याचप्रमाणे सिंथेटिक, रासायनिक रंग त्वचेसाठी घातक असल्यामुळे नैसर्गिक रंगाचा वापर केला जावा.

सण साजरा करत असताना रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. होळी दहन होत असताना जवळपास पाण्याची बादली वगैरे अग्निशमन साहित्य उपलब्ध राहील याची दक्षता घेतली जावी. जर एखादा अनुचित प्रकार घडला तर कृपया 112 क्रमांकावर त्वरित त्याची माहिती द्यावी आमचे पोलीस पथक तात्काळ अवघ्या 7 मिनिटात त्या ठिकाणी दाखल होईल. सण साजरा करण्यासाठी साऊंड सिस्टिमचा वापर करणाऱ्यांनी त्यासाठी स्थानिक पोलिसांची परवानगी घ्यावी.

डीजेवर पूर्णपणे बंदी असून आवाजाची तीव्रता मर्यादा 75 डिसिबल इतकी असेल असे स्पष्ट करून नागरिकांनी कृपया पोलीस प्रशासनाच्या मार्गसूचीचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करून पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी शहरवासीयांना होळी व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

मराठी प्राथमिक शाळा नं. 5 चवाट गल्ली येथे मराठी भाषा दिन, स्नेहसंमेलन व आदर्श विद्यार्थी विद्यार्थिनी पारितोषिक सोहळा

Spread the love  बेळगाव : आज शाळा नं 5 चवाट गल्ली येथे मराठी भाषा दिन, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *