Sunday , July 26 2026
Breaking News

मराठी प्राथमिक शाळा नं. 5 चवाट गल्ली येथे मराठी भाषा दिन, स्नेहसंमेलन व आदर्श विद्यार्थी विद्यार्थिनी पारितोषिक सोहळा

Spread the love

 

बेळगाव : आज शाळा नं 5 चवाट गल्ली येथे मराठी भाषा दिन, स्नेहसंमेलन आणि माजी विद्यार्थी संघातर्फे दीपक किल्लेकर पुरस्कृत आदर्श विद्यार्थी विद्यार्थिनी पारितोषिक वितरण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

आजच्या कार्यक्रमाला या शाळेचे माजी विद्यार्थी संघांचे अध्यक्ष श्री. दीपक किल्लेकर अध्यक्षस्थानी होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून मध्यवर्ती वाचनालयाचे अध्यक्ष श्री. नेताजी जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करून झाले

प्रारंभी, मुचंडीकर सर यांनी प्रास्ताविक केले. त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांच्या वार्षिक प्रगतीचा आढावा घेतला.
यावेळी माजी विद्यार्थी संघातर्फे दीपक किल्लेकर पुरस्कृत दरवर्षी दिला जाणारा आदर्श विद्यार्थी व आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार जाहीर करण्यात आला. सन 2025-26 सालातील आदर्श विद्यार्थी म्हणून इ. 7 वी चा विद्यार्थी पार्थ बाळकृष्ण धनगावडे याची तर आदर्श विद्यार्थिनी म्हणून खुशी सुरेश शहापूरकर हिची सर्वानुमते निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना ढाल व रोख बक्षीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

आजचे प्रमुख वक्ते श्री. नेताजी जाधव यांनी आपल्या भाषणात मुलांना आणि पालकांना मातृभाषेतून शिक्षण घेण्याचे महत्व पटवून दिले. तसेच मुलांना मनापासून अभ्यास करण्यास आणि व्यायाम करण्यास सांगितले. नकारात्मक विचार दूर करून सकारात्मक विचारांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी त्यांनी कानमंत्र दिला.

प्राचार्य एम एम जाधव यांनी मुलांना वाचन करण्यासाठी महत्त्वाच्या पुस्तकांची माहिती दिली. वाचनामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. वाचन केलो तर हवे तसे ज्ञान प्राप्त करता येते. म्हणून मुलांनी आतापासूनच वाचनाची सवय लावून घ्यावी असा मोलाचा सल्ला दिला.

अध्यक्षीय भाषणात दीपक किल्लेकर यांनीही मराठी ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांच्याप्रमाणे मातृभाषेचे महत्व समजून आपल्या मातृभाषेचा सन्मान करून मुलांना यशस्वी होण्यासाठी चांगला अभ्यास करण्याचा सल्ला दिला.

यानंतर मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रमांना मुलांनी आणि सर्व उपस्थितानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सदर कार्यक्रमास ज्योती कॉलेजचे प्राचार्य एम एम जाधव, निवृत्त जीएसटी अधिकारी एम. जी. कुंभार, एसडीएमसी अध्यक्षा तुपारे मॅडम, स्मिता किल्लेकर व विद्यार्थी संघांचे रवी नाईक, श्रीकांत कडोलकर, अमृत जाधव, इतर पदाधिकारी, पालक व एसडीएमसी पदाधिकारी आणि शाळेचा सर्व स्टाफ आवर्जून उपस्थित होते..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पी.ए. माळी सर यांनी केले तर आभार श्री नाथबुवा सर यांनी मानले..

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *