Tuesday , March 3 2026
Breaking News

मिशन ऑलंपिक असोसिएशन यांच्या वतीने रविवारी भव्य निकाली जंगी कुस्ती मैदान

Spread the love

महिला दिना निमित्त महिलांच्याही रंगणार कुस्त्या

बेळगाव : मिशन ऑलंपिक गेम असोसिएशन कर्नाटक राज्य यांच्या वतीने येत्या रविवार दिनांक ८ मार्च रोजी आनंदवाडी आखाडा बेळगाव येथे भव्य निकाली जंगी कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले आहे.
येत्या रविवारी होणाऱ्या या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकांची कुस्ती बाळू अपराध महाराष्ट्र चॅम्पियन विरूध्द हरिश कुमार हरीयाणा (हरीयाणा केसरी), द्वितीय क्रमांक कामेश पाटील कंग्राळी (कर्नाटक कंठीरेवा) विरूद्ध हितेश पाटील (आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेता) पुणे, तृतीय क्रमांक दिग्विजय जाधव (महाराष्ट्र चॅम्पियन) विरूद्ध प्रेम जाधव (कर्नाटक चॅम्पियन), चौथे क्रमांक पार्थ पाटील (कंग्राळी) विरूद्ध बबलू नरळे (सातारा), पाचवा क्रमांक प्रथमेश हट्टीकर (कंग्राळी) विरूध्द धीरज पाटील (सह्याद्री कुस्ती संकुलन पुणे), सहावा क्रमांक कार्तिक (इंगळगी) विरूध्द पृथ्वीराज पाटील (कंग्राळी), सातवा क्रमांक विनायक (येळ्ळूर) विरूद्ध राजु (शिनोळी), भूमिपुत्र (मुतगा) विरूध्द ध्रुव (मण्णीकेरी), संभाजी (काकती) विरूध्द इंद्रजित शेळके(सांगली), प्रणव (उचगाव) विरूध्द विपुल जावलकर (पुणे) अशा 60हून अधिक जोड लावण्यात येणार आहेत. तसेच.

महिला दिनानिमित्त महिला कुस्त्यांचेही आयोजन

येत्या रविवारी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन निमित्त आनंदवाडी आखाडा येथे महिलांच्या भव्य निकाली जंगी कुस्ती मैदान आयोजित करण्यात येणार आहे. यानिमित्त कर्नाटक व महाराष्ट्रातील नामवंत महिला कुस्ती पटू सहभागी होणार आहेत. या प्रितम दाभाडे (पुणे) महाराष्ट्र चॅम्पियन विरूद्ध सुजाता हल्याळ,कर्नाटक चॅम्पियन, प्रांजल तुळजाई बेळगाव स्पोर्ट्स हॉस्टेल विरूद्ध रिंकु नलवडे पुणे, खुशी खादरवाडी विरूद्ध रूतुजा रावळ शहापुर भक्ती गावडा मोदेकोप विरूद्ध रिया बस्तवाड श्रृती खादरवाडी विरूद्ध प्रनोती पाटील कोल्हापूर सुश्मा शिंदे खादरवाडी विरूध्द सई किल्लेकर मजगाव समिधा बिर्जे वडगाव विरूद्ध प्रितम हूले पूणे अशा १५ हून अधिक कुस्त्या आयोजित करण्यात आल्या आहेत. तर आकर्षक कुस्ती पुरूषांच्या मध्ये श्रेयस हट्टीकर, गगन अलारवाड भारतीय वायु सेना स्पोर्ट्स स्कुल विरूद्ध पांडू तुर्केवाडी महिला कुस्ती प्रभा खादरवाडी विरूद्ध कल्याणी अंबोळकर प्रांजल बिर्जे विरूद्ध रिया बेळगाव तर उद्घाटन कुस्ती साई गावडे मुचंडी विरूध्द सम्राट पाटील बेनकनहळ्ळी राजविर पाटील मंडोळी विरूद्ध शेखर खादरवाडी. यांच्यात होणार आहे. तरी सर्व कुस्ती शौकीनानी याचा लाभ घ्यावा, असे संघटनेचे अध्यक्ष पै. अतुल शिरोले व संघटनेच्या सर्व पदाधिकारांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे..

About Belgaum Varta

Check Also

मराठी प्राथमिक शाळा नं. 5 चवाट गल्ली येथे मराठी भाषा दिन, स्नेहसंमेलन व आदर्श विद्यार्थी विद्यार्थिनी पारितोषिक सोहळा

Spread the love  बेळगाव : आज शाळा नं 5 चवाट गल्ली येथे मराठी भाषा दिन, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *