Wednesday , March 4 2026
Breaking News

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची बेळगाव आर. एस. एस. कार्यालयाला भेट

Spread the love

बेळगाव : बेळगाव येथे एका खासगी समारंभात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आले असता कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी बेळगाव येथील आर. एस. एस. मुख्यालयाला भेट दिली.

या प्रसंगी त्यांनी कार्यालयाला भेट देऊन स्थानिक आर. एस. एस. पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. तसेच प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना त्यांनी आपण कोणत्याही गावाला गेलो की तेथील संघाच्या कार्यालयाला भेट देतो असे सांगितले.

तसेच 2024 लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपच सत्तेवर येईल असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी आपल्या नियोजित पुढील कार्यक्रमांची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *