Monday , September 21 2026
Breaking News

महिला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love

बेळगाव : गणेशपूर येथे रात्री ३ च्या सुमारास डॉक्टर महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. भारती उपेंद्र यलगुद्री (वय ४७) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. सदर महिलेने आपल्या मुलाने अभ्यास केला नसल्याने रागाच्याभरात आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

भारती यांनी गळ्याला फास आवळून आत्महत्या केल्याचे तिच्या घरच्यांच्या लक्षात येताच तिला उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले मात्र उपचारांचा काहीही उपयोग न झाल्याने तिचा मृत्यू झाला. घटनेची नोंद कॅम्प पोलीस स्थानकात करण्यात आली असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *