Tuesday , March 3 2026
Breaking News

माजी नगरसेवक नेताजी मणगुतकर यांचे निधन

Spread the love


बेळगाव : भारतनगर शहापूर येथील रहिवासी आणि बेळगावचे माजी नगरसेवक श्री. नेताजी (बाळू) अप्पाजी मनगुतकर (52) यांचे रात्री 1 वाजता हृदयविकराच्या तीव्र धक्याने निधन झाले आहे.
तिरंगा सेवा संघटनेच्या माध्यमातून विविध प्रकारची सामाजिक कार्ये हाती घेऊन, नेताजी मनगुतकर यांनी खासबाग, वडगाव, भारत नगर परिसरात स्वतःची ओळख निर्माण केली होती. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनात त्यांचा सहभाग असे. नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी बेळगाव महापालिकेत अत्यंत आक्रमकरीत्या आपली भूमिका पार पाडण्याचे काम केले. आपल्या प्रभागातून अनेक विकासाची कामे धडाडीने पूर्ण केली. मराठी भाषिकांबरोबरच वडगाव, खासबाग परिसरातील कानडी भाषिक जनतेतही त्यांनी विश्वासाचे नाते निर्माण केले होते. उत्कृष्ट शरीरसौष्ठवपटू म्हणून ते ओळखले जात. शरीरसौष्ठव स्पर्धेत त्यांनी “बेळगाव श्री’ किताबही पटकावला होता. त्यांनी बेळगाव परिसरात मोठा मित्रपरिवार जोडला होता.

त्यांच्या पश्चात पत्नी, चिरंजीव, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

 

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *