बेळगाव : विविध संघटनांच्या महिलांच्या शिष्टमंडळाने बेळगाव शहराच्या वाहतूक आणि गुन्हे विभागाच्या डीसीपी स्नेहा यांची भेट घेऊन महिला सुरक्षा आणि शहर आजूबाजूच्या परिसरात होत असलेल्या गुन्ह्यांबाबत विविध समस्या मांडल्या.
महिला शिष्टमंडळाने प्रामुख्याने महिला सुरक्षा आणि शहरातील अतिरिक्त महिला पोलीस ठाण्यांसाठी विनंती केली. त्यांनी मानसिकदृष्ट्या विकलांग महिलांबद्दल देखील चिंता व्यक्त केली. ज्यांच्यावर अनेक वेळा बलात्कार झाला आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सलग दुसर्या वर्षी प्रसूती होणार आहे. त्यांनी डीसीपींना योग्य ट्रॅफिक व्यवस्थापनासह रस्त्यावरून चालण्यासाठी सुरक्षित फूटपाथची विनंती केली.
डीसीपी स्नेहा यांनी त्यांच्या समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. कार्यालय आणि महिला पोलिस स्टेशनला भेट दिलेल्या सदस्यांच्या शिष्टमंडळात शोभा पाटील, सरोजा कुरबेट, शांतादेवी खाबूर, आरती अंगडी, अनुपमा जकातीमठ, जयश्री पाटील आणि मैत्रयी बिस्वास यांचा समावेश होता.
Check Also
येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ शनिवारी
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने 20 वे येळ्ळूर ग्रामीण …