Monday , September 21 2026
Breaking News

घोटगाळी ग्राम पंचायतीतील नरेगा कामाचा (मेट) कायक बंधु बदलु नका : ता. पं. अधिकाऱ्यांना निवेदन

Spread the love


खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील घोटगाळी ग्राम पंचायतीच्या वतीने महात्मा गांधी नरेगा योजनेच्या कामाला सुरूवात झाली आहे. घोटगाळी ग्राम पंचायत हद्दीतील ९ गावातील रोजगाराना महात्मा गांधी नरेगा योजनेचे काम मिळाले आहे.
मात्र घोटगाळी ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी महात्मा गांधी नरेगा योजनाचा (मेट) कायक बंधू बदलून रोजगार लोकावर अन्याय करत आहेत,अशी तक्रार घोटगाळीचे खेमराज गडकरी यांनी ओबीडएसमॅन जिल्हा पंचायच बेळगांव याच्याकडे केली असुन यासंदर्भात तालुका पंचायतीच्या ए, डी यांच्याकडे ही लेखी तक्रार निवेदनाद्वारे दिली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नकली रोजगारचे एनएमआर वापरून पंचायतीमधील निधी लाटण्याचा प्रकार असून अचानक जुना (मेट) कायक बंधू बदलून दुसरा नेमणे म्हणजे मनमानी कारभार आहे.
कोणत्या ग्राम पंचायतीच्या कर्मचाऱ्यांना (मेट) कायक बंधू बदलण्याचा अधिकार नाही. मग घोटगाळी ग्रा. पं. कर्मचारीवर्गाना हा अधिकार कोणी दिला.
घोटगाळीतील नरेगा योजनेचा (मेट) कायक बंधू बदल्यास त्याचा विरोधात आंदोलन छेडू व तालुका पंचायतीच्या अधिकारी वर्गाने त्याच्यावर कारवाई करावी.
घोटगाळी ग्रा. पं. हद्दीतील ९ गावच्या रोजगाराना न्याय द्यावा. अशा मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी निवेदन देताना काँग्रेसचे नेते इरफान तालिकोटी देवाराई, खेमराज गडकरी घोटगाळी, संतोष पाटील शिंदोळी, परशराम कोलेकर कोडगई आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *