Monday , September 21 2026
Breaking News

शेतातील विद्युत मोटारी चोरणाऱ्या तिघांना ग्रामीण पोलिसांकडून अटक

Spread the love


बेळगाव : मच्छे आणि झाड शहापूर परिसरातील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरी करणाऱ्या तिघांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली.
सय्यदअली खासीनसाब नायकवाडी (वय 26 राहणार जनता कॉलनी खादरवाडी), नागराज लक्ष्मण करनायक (वय वर्षे 24, राहणार जनता कॉलनी, पिरनवाडी) तसेच रुद्रेश मल्लाप्पा तलवार (वय वर्षे 21, राहणार जनता कॉलनी, पिरनवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या विद्युत मोटार चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 270000 रुपये किमतीच्या मोटारी जप्त केल्या आहेत.
हे चोरटे गेल्या सहा महिन्यापासून मच्छे, झाडशहापूर, देसुर, वाघवडे परिसरातील शेतात जोडण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी व केबल चोरी करून त्याची अन्यत्र विक्री करीत होते.
योग्य दिशेने तपास करीत वडगाव ग्रामीण पोलिसांनी चोरट्यांना अटक केली. ग्रामीण सीपीआय सूनिलकुमार नंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अनंत आदगोड, हवालदार योगेश तलेवाडा, कोटबागी आदीनी ही कारवाई केली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *