अथणी : मालमत्तेच्या हव्यासापोटी प्रियकराने प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना अथणी शहरात उघडकीस आली आहे. सुजाता पवार (वय 34) असे मृत महिलेचे नाव असून मालमत्ता हडपण्याचा उद्देशाने ही हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अथणी येथील रहिवासी सुजाता यांचा मृतदेह प्रदीप गुंडा यांच्या उसाच्या शेतात 5 मार्च रोजी आढळून आला होता. सुजाता यांचे सासर हारुगिरी हे असून त्या सध्या आपल्या पतीपासून विभक्त होऊन अथणी येथे आपल्या माहेरी राहत होत्या. सुजाता यांचे कुंभार हवालदार नाम व्यक्तीशी प्रेम संबंध होते. सुजाता यांच्या नावावर असलेली मालमत्ता आपल्या नावावर करण्यासाठी कुंभार यांनी हत्तेचा कट रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून आरोपी कुंभार याला अथणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 5 मार्च रोजी सुजाता पवार यांना आपल्या कुंभार याने आपल्या दुचाकीवरून नेले होते. अथणी शहराजवळील का उसाच्या शेतात सुजाता यांना नेऊन कापडाच्या सहाय्याने सुजाता यांचा गळा आवळून खून केला. याप्रकरणी अथणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती अथणी पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta