Friday , August 28 2026
Breaking News

बेळगाव उत्तरमधील विकासकामांची अमान सेठ यांच्याकडून पाहणी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघातील विकासकामांना वेग देण्यासाठी अमान सेठ यांनी विविध भागांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या असून कामाच्या दर्जाबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

आमदार आसिफ सेठ यांच्या सूचनेनुसार अमान सेठ यांनी अमान नगर, शिफा कॉलनी आणि हकीम कॉलनीमधील सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. ही सर्व कामे विहित दर्जा राखून आणि ठराविक मुदतीत पूर्ण होतील याची खात्री करण्याचे कडक निर्देश अमान सेठ यांनी दिले..मतदारसंघातील विविध वस्त्यांना भेटी देऊन अमान सेठ यांनी स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी पायाभूत सुविधांबाबत मांडलेल्या समस्यांची दखल घेत, यासंदर्भातील अहवाल आमदार आसिफ सेठ आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला जाईल, असे आश्वासन अमान सेठ यांनी दिले.

About Belgaum Varta

Check Also

बसस्थानकात चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेचे साडेपाच लाखांचे दागिने लंपास

Spread the love गर्दीचा फायदा घेत डाव साधला; सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *