Friday , August 28 2026
Breaking News

नूतन महापौर, उपमहापौरांची निवड 18 रोजी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाचा कार्यकाळ शनिवार दि. 14 रोजी संपुष्टात येणार आहे. त्यापूर्वी पुढील महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणुकीचे वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले.

बुधवार दि. 18 रोजी महापौर-उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता या पदांवर कोणाची वर्णी लागणार याची चर्चा रंगू लागली आहे. आगामी काळासाठी महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी तर उपमहापौर पद सर्वसाधारण गटासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. महापौर-उपमहापौर निवडणुकीमध्ये 58 नगरसेवक, 7 आमदार, खासदार व मंत्री अशा एकूण 65 जणांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

त्यामुळे महापौर-उपमहापौर पदासाठी भाजपकडून कोणाला पुढे केले जाणार यासाठी खलबत्ते चालली आहेत. महानगरपालिकेच्या 23 व्या महापौर-उपमहापौर पदाचा कार्यकाळ शनिवार दि. 14 रोजी संपणार आहे. मागील आठवड्यात मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी निवडणूक घेण्यासंदर्भात प्रादेशिक आयुक्तांना पत्र लिहिले होते. प्रादेशिक आयुक्तांनी परवानगी दिल्यानंतर बुधवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. बुधवार दि. 18 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून महापौर-उपमहापौर पदांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज दाखल केल्यानंतर दुपारी 1 वाजता यासंदर्भातील निवड केली जाणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेकडून निवड प्रक्रियेसाठी तयारी केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

कै. बहिर्जी शिरोळकर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन!

Spread the love  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, बहिर्जी शिरोळकर पदवी पूर्व महाविद्यालय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *