Wednesday , June 24 2026
Breaking News

कलिंगड, द्राक्षांची आवक होऊनही दरवाढीमुळे ग्राहकांची खरेदीकडे पाठ

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : यावर्षी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. त्यापासून बचाव करण्यासाठी निपाणी बाजारपेठेत कलिंगड आणि द्राक्षांची आवक वाढत आहे. तरीही दरवाढ असल्याने ग्राहकांनी त्यांच्या खरेदीकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. सध्या कलिंगड आकारानुसार ५० ते १५० रुपये तर द्राक्ष प्रतिकिलो २६०ते २८० किलोप्रमाणे विक्री होत आहे.
उन्हाळा वाढत असल्याने शहरात चौका-चौकासह रस्त्याच्या कडेला कलिंगड आणि द्राक्षांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. आणि यंदा मोठ्या प्रमाणात दरबार झाल्याने अजूनही ग्राहकांनी त्यांची खरेदी सुरू केली नाही. दरवाढ झाल्याने नागरिक शितपेये, रसवंतीगृहे, आईस्क्रीमच्या स्टॉलवर गर्दी करीत आहेत. याशिवाय फळांचे दरही प्रति किलो १०० ते १६० रुपये किलोवर पोहोचले आहेत. आता गुढी पाडव्याला आंब्यांचा हंगामही सुरू होणार आहे. त्यामुळे या काळात कलिंगड आणि द्राक्षांचे दर उतरण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सध्या बाजारात कलिंगड आणि द्राक्षांची आवक म्हणावे तसी सुरू नाही. त्यामुळे अजून दर चढेच आहेत. ओळख वाढल्यास दर कमी होण्याची शक्यता असल्याचे कलिंगड व्यापारी यासीन पट्टेकरी यांनी व्यक्त केली.

About Belgaum Varta

Check Also

हेस्कॉमचे खाजगीकरण झाल्यास गंभीर परिस्थिती

Spread the love  राज्यध्यक्ष राजू पोवार; रयत संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनासाठी बेंगलोरला रवाना निपाणी (वार्ता) : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *