Friday , August 28 2026
Breaking News

सौंदत्ती यल्लम्मा मंदिरात 3.07 कोटींची विक्रमी देणगी

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक, महाराष्ट्रासह गोवा राज्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावर भाविकांच्या वाढत्या ओघामुळे भक्तांनी देवीचरणी अर्पण केलेल्या देणगीने नवा विक्रम प्रस्थापित केला असून यावर्षी मंदिराच्या दानपेटीत 3 कोटी हून अधिक रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने जमा झाले आहेत. मागील चार दिवसांपासून मंदिरातील दानपेटीची मोजदात सुरू आहे. सौंदत्ती तालुक्यातील श्रीक्षेत्र रेणुका यल्लम्मा मंदिरात 9 मार्च ते 12 मार्च दरम्यान दानपेटीतील रक्कम मोजणी करण्यात आली. यामध्ये एकूण 3 कोटी सात लाख रुपये रक्कम दान जमा झाल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.

यावर्षी देवीच्या दानपेटीत पडलेल्या दानाची रक्कम मोठ्या प्रमाणात जमा झाली आहे. यामध्ये 2 कोटी 78 लाख रुपये रोख रकमेसह 16 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्याचप्रमाणे 12 लाख 35 हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने मंदिराच्या दानपेटीत जमा झाले आहे  या मोजणी प्रक्रियेत मंदिर प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिक महाविद्यालय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून पारदर्शकपणे मोजणीचे काम पूर्ण केले आहे. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यल्लम्मा डोंगरावर देवीच्या दर्शनासाठी भक्तगण शेजारील विविध राज्यातून येत असतात  देवीवरील श्रद्धेचा भाग म्हणून भक्त सढळ हस्ते दानपेटीत दान घालत असतात. हा जमा झालेला निधी मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी वापरण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. मोजणी प्रक्रियेत सहभागी झालेल्या कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही जबाबदारी पार पाडल्याचे देखील मंदिर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. डोंगर परिसरात भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, निवास व्यवस्था, स्वच्छतागृह आणि मंदिर परिसराचे सुशोभीकरण यासारख्या मूलभूत सुविधांच्या कामासाठी हा निधी खर्च करण्यात येणार असल्याचे मंदिर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात ३५० विद्यार्थ्यांनी बांधल्या १००० हून अधिक राख्या

Spread the love  बेळगाव : रक्षाबंधनाचा सण केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित न ठेवता कृतज्ञता, मानवता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *