Friday , August 28 2026
Breaking News

काम चालू, रस्ता बंद असल्याने मांगुर फाटा, मुरगुड रोडवर वाहतुकीची कोंडी

Spread the love

 

राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा परिणाम; नागरिकासह वाहनधारकांचा फेऱ्याने प्रवास

निपाणी (वार्ता) : पुणे-बेंगळुर राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील मुरगुड रोडवरील भुयारी मार्गाची एक बाजू आठवड्यापासून बंद करण्यात आली आहे. त्याशिवाय मांगुर फाटा जवळ यमगर्णी नदी पुला शेजारी काम सुरू असल्याने दोन्ही ठिकाणी दुसऱ्या विरोधी बाजूने दुहेरी वाहतूक सुरू असल्याने वारंवार वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शाळा, महाविद्यालय विद्यार्थ्यांनाही याचा त्रास होत आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबवर रांगा लागत असून फेऱ्याने प्रवास करावा लागत आहे.
परिसरातील वाहनधारक आणि प्रवासी, बेळगाव, मुरगुड, राधानगरी या नागरिक निपाणीला ये- जा करण्यासाठी मुरगुड रोड भुयारी मार्गाचा वापर करतात. या भुयारी मार्गाच्या रुंदीकरणास प्रारंभ झाल्याने बोगद्यातून होणारी एका बाजूची वाहतूक थांबवण्यात आली आहे. त्यामुळे दुसऱ्या बाजूला दुहेरी वाहतूक बंद असल्याने त्याचा ताण वाढला आहे. शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या देवचंद महाविद्यालय आणि मोहनलाल जोशी विद्यालयाला जाणाऱ्या विद्यार्थ्यासह कामगार, प्रवासीही या मार्गाचा वाहतुकीसाठी वापर करतात. अशात भुयारी मार्गानजिक रस्ता बंद असल्याने सर्वांच्या अडचण होत आहे. याशिवाय मांगुर फाट्यावर महामार्गाचे काम सुरू असल्याने मांगुर फाट्यापासून पुन्हा सौंदलगाजवळयेथे जाऊन उड्डाण पुला मार्गे खाजगी वाहन आणि बसना जावे लागत आहे. तरी संबंधित कंत्राटदारांनी वेळेत काम पूर्ण करून वाहनधारकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.
——————————————————————–

‘पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे हस्ते बंद होत असल्याने फेऱ्याने प्रवास सुरू असून परिणामी वाहनधारकासह प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी संबंधित कंत्राटदारांनी वेळेत काम पूर्ण करून वाहनधारक व नागरिकांना दिलासा द्यावा.’
-आप्पासाहेब ढवणे, माजी ग्रामपंचायत सदस्य, सौंदलग

About Belgaum Varta

Check Also

नूतन मराठी विद्यालयामध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *