
बेळगाव : बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीच्या स्केटिंगपटू करुणा वाघेला, श्रेया वाघेला आणि शिवानी वाघेला यांना बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत बेळगाव आणि समाज कल्याण खात्याच्यावतीने सन्मानित करण्यात आले आहे.
5 एप्रिल रोजी एपीएमसी मार्केट यार्ड येथे हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. स्केटिंग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल करुणा वाघेला, श्रेया वाघेला आणि शिवानी वाघेला यांचा महापालिका आयुक्त एस. जी. हिरेमठ आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी रुद्रेश घाळी यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मल्लेश चौगुले, माजी नगरसेवक दीपक वाघेला, सामाजिक कार्यकर्ते विजय नारगद्री, सुभाष चव्हाण, मुकेश लालबेग उपस्थित होते.
करुणा, श्रेया आणि शिवानी वाघेला यांना डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार श्याम घाटगे तसेच बेळगाव जिल्हा स्केटिंग असोसिएशन अध्यक्ष उमेश कलघटगी, जायंट्सचे राजू माळवदे यांचे प्रोत्साहन आणि स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलेकर, विशाल वेसणे, योगेश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta