
बेळगाव : गांजा विकणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक करून मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी खंजर गल्ली येथील युनिस अब्दुल कादर वय 23 आणि पंजीबाबा कॉलनीतील सुलतान अहमद हमीद शहा यांना अटक करून त्यांच्या जवळून 500 ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे.
खंजर गल्लीतील पार्किंग जवळ गांजा विक्री सुरू असल्याची माहिती मार्केट पोलीस स्थानकाला मिळाली. यावेळी त्यांनी सापळा रचत आरोपींना रंगेहात पकडले. तसेच आरोपींवर मार्केट पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta