Monday , September 21 2026
Breaking News

आंबेवाडी गावातील रस्त्याची दुरावस्था

Spread the love

बेळगाव : आंबेवाडी येथील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी रस्त्यावर मातीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आता अधूनमधून कोसळणार्‍या पावसाने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून दुचाकी घसरण्याच्या घटनेत वाढ होत आहे. येथील रस्त्याचा विकास करण्याकरिता रस्ते खोदाई करण्यात आली. मात्र काम पूर्ण करण्याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.

तसेच एक रस्ता खाली आणि दुसरा रस्ता वर असल्याने गावकऱ्यांना या मार्गावरून जाताना अडथळा निर्माण होत असून काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *