Sunday , April 5 2026
Breaking News

बेकायदेशीर शस्त्रांसह मार्केट पोलिसांकडून तिघांना अटक

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मार्केट पोलिसांनी संशयास्पद व्यक्तींची तपासणी करताना शस्त्रे बाळगणाऱ्या तीन तरुणांना अटक केली आहे. तसेच एका अन्य कारवाईत मटका जुगार खेळणाऱ्या महिलेलाही ताब्यात घेण्यात आले आहे.

मार्केट पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हुसेनसाब केरूर आणि त्यांचे पथक सोमवारी महाद्वार रोडवरील ओव्हर ब्रिजखाली तपासणी करत होते. यावेळी संशयास्पदरित्या वावरणाऱ्या हर्षराज यळ्ळूरकर (२०), साई सेनावा (१९) आणि प्रेम कांबळे (२०) या तिघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे बेकायदेशीररित्या बाळगलेली धारदार तलवार सापडली. पोलिसांनी ही तलवार जप्त करून तिन्ही आरोपींविरुद्ध आर्म्स ॲक्ट आणि कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

दुसऱ्या एका कारवाईत मार्केट पोलिसांनी खडेबाजार परिसरातील रामराज कापड दुकानाजवळ छापा टाकला. यावेळी सार्वजनिक ठिकाणी लोकांकडून पैसे घेऊन मटका जुगार खेळवत असलेल्या एका महिलेला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. तिच्याकडून जुगाराचे साहित्य आणि रोकड जप्त करण्यात आली असून मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दोन्ही कारवायांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांसह कर्मचाऱ्यांचे बेळगावचे पोलीस आयुक्त आणि पोलीस उपआयुक्तांनी विशेष कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावमध्ये मटका अड्ड्यांवर छापे : तिघांना अटक

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात सुरू असलेल्या अवैध मटका व्यवसायावर पोलिसांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *