Sunday , April 5 2026
Breaking News

कपिलेश्वर मंदिराच्यावतीने जोतिबा डोंगराकडे प्रस्थान करणाऱ्या भाविकांना देण्यात आल्या शिधास्वरूपात वस्तू तर बैल जोड्यांना सकस आहार

Spread the love

 

बेळगाव : चैत्र पौर्णिमेसाठी बैलगाड्या व सासन काठी घेऊन बेळगावहून जोतिबा डोंगराला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिराच्यावतीने शिधास्वरूपात वस्तू देण्यात आल्या तसेच बैल गाड्यांना जुंपलेल्या बैलांसाठी पौष्टिक खाद्य देण्यात आले. इतकेच नाही तर पहिल्या मुक्कामी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

चैत्र पौर्णिमेसाठी प्रतिवर्षी चव्हाट गल्ली, बेळगाव येथून देवदादा सासनकाठी, नार्वेकर गल्ली बेळगाव येथून ज्योतिर्लिंग देवस्थान सासन काठी आणि कोंडुस्कोप येथील सासनकाठी जोतिबा डोंगरावर जाते. बैलगाड्या व सासन काठी घेऊन बेळगावहून जोतिबा डोंगराला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिराच्यावतीने सालाबाद प्रमाणे खाद्योपयोगी वस्तू आणि बैल जोड्यांसाठी पौष्टिक आहार देण्यात आला.तसेच पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन तिथे विधिवत पूजा महाआरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
मंदिराचे अध्यक्ष राहुल कुरणे, अभिजीत चव्हाण, अजित जाधव, प्रसाद बाचुळकर, राजू भातकांडे, तानाजी मुतकेकर, अभय लगाडे, जोतिबा कावळे, प्रथमेश कावळे, रणजीत जाधव, सचिन सत्तेगिरी, आनंद बाळेकुंद्री, मदन मनगुतकर, अनिल पावशे, दौलत जाधव, संतोष हजार, पवन मन्नुरकर, अभी पवार, निसर्ग चव्हाण, रोशन नाईक या पदाधिकारी आणि सेवेकऱ्यांसह महिला सेवेकरी, विश्वस्त उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे शिक्षणातील ए.आयवर विचारमंथन

Spread the love  मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या प्रा. प्रशांत ढोपे यांचा शिक्षकांशी परिसंवाद बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *