Sunday , April 5 2026
Breaking News

चचडी ग्रामस्थांनी पुकारला सरकारी एमएसआयएल दारू दुकानाविरोधात एल्गार 

Spread the love

 

सौंदत्ती : चचडी ग्रामस्थांनी सरकारी एमएसआयएल दारू दुकानाविरोधात एल्गार पुकारला असून गावातील शांतता आणि सुव्यवस्था मोडीत काढणाऱ्या आणि युवा पिढीला दिशाहीन करणाऱ्या गावातील दारू दुकानाला त्वरित टाळे ठोकावेत अशी मागणी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
बागलकोट जिल्हा राज्य महामार्गा शेजारी सौंदत्ती तालुक्यातील चचडी या गावातील सरकारी एमएसआयएल दारू दुकान गावातील महिलांसाठी डोकेदुखी ठरले आहे. गावातील बहुतांश पुरुष मंडळी कामधंदे सोडून दारूच्या आहारी गेली आहेत. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होऊन त्यांच्या अकाली मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. इतकेच नाही तर दारूच्या आहारी गेलेल्या पुरुष मंडळींमुळे सुखी संसार उद्ध्वस्त होत आहेत. चचडी गावामध्ये शाळा महाविद्यालयांना जाणारे विद्यार्थी आहेत. त्यांच्यावर गावातील दारूचे दुकान आणि दारुड्यांमुळे अनिष्ट परिणाम होत आहेत. काही युवक देखील व्यसनाधीन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या दारू दुकानामुळे संपूर्ण गावाचे स्वास्थ्य आणि शांतता बिघडली आहे. याचा गांभीर्याने विचार करून संपूर्ण गावाचे स्वास्थ्य आणि शांतता बिघडविणारे हे दारू दुकान ताबडतोब बंद करावे अशी मागणी गावातील महिला आणि काही सुज्ञ लोकांनी केली आहे.
चचडी गावातील हे सरकारी एमएसआयएल दारू दुकान तात्काळ बंद करावे, अशा मागणीचे निवेदन महिलावर्गाने जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केले आहे. निवेदनाची एक प्रत पोलीस प्रशासनाला देण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे शिक्षणातील ए.आयवर विचारमंथन

Spread the love  मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या प्रा. प्रशांत ढोपे यांचा शिक्षकांशी परिसंवाद बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *