Sunday , April 5 2026
Breaking News

सुखकर्ता महिला मंडळाच्यावतीने महिला दिन साजरा

Spread the love

 

बेळगाव : भाग्यनगर येथील सुखकर्ता महिला मंडळाच्या वतीने शनिवार दिनांक 28-3-2026 रोजी टिळकवाडी येथील अर्श विद्याश्रम व वडगाव येथील अनाथाश्रमाला भेट देऊन महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. आश्रमातील मुलींच्या प्रार्थनागीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आश्रमाच्या अध्यक्षा सौ. भारती मॅडम यांनी आश्रमाची व विद्यार्थ्यांची सर्व माहिती सांगितली. मंडळाच्या सर्व महिलांनी गरीब व अनाथ मुलांच्यासोबत मनसोक्त चर्चा करून सर्वांना भेटवस्तू देण्यात आली. मुलांच्यासोबत मोठ्या आनंदाने हा महिला दिन साजरा झाला. हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी सर्व महिलांनी परिश्रम घेतले. मंडळाच्या अध्यक्षा प्रिया सायनेकर यांनी सूत्रसंचालन केले तर सौ.सीमा पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावमध्ये मटका अड्ड्यांवर छापे : तिघांना अटक

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात सुरू असलेल्या अवैध मटका व्यवसायावर पोलिसांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *