Monday , September 21 2026
Breaking News

हिडकल जलाशयात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू

Spread the love

 

हुक्केरी : शाळांच्या उन्हाळी सुट्टीत हिडकल जलाशयाच्या खाडीत पोहायला गेलेल्या पाच मुलांपैकी दोघांचा सोमवारी दुपारी हुक्केरी तालुक्यातील हाळेगुडनट्टीजवळ बुडून मृत्यू झाला. घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

कृष्णा विठ्ठल खानापुरे (वय १४) आणि प्रज्वल गोकरा (वय १४) दोघेही (रा.दादाबनट्टी येथील आरसी सेंटर) अशी मृत मुलांची नावे आहेत. सुट्टीत आरसी सेंटर गावातील पाच मुले हाळेगुडनट्टी गावातील मंदिराजवळील हिडकल जलाशयाच्या खाडीत पोहायला गेली होती. त्या पाचपैकी तिघे सुखरूप बचावले गेले, तर कृष्णा आणि प्रज्वल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आणि बुडून मृत्यू पावले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *