Monday , May 25 2026
Breaking News

‘सर्वोत्तम श्राविका’ पुरस्कार मिळाल्याने मिनाक्षी पाटील यांचा विविध संघसंस्थातर्फे सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : सामाजिक, धार्मिक कार्य आणि सेवाभावी वृत्तीमुळे निपाणी मतदारसंघात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मीनाक्षी रावसाहेब पाटील यांना नवी दिल्ली येथील ‘भारत दिवस दिगंबर जैन महिला महासभेतर्फे ‘सर्वोत्तम श्राविका’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानिमित्त त्यांचा निपाणी मतदारसंघातील विविध संघ संस्था, युवक मंडळ, सामाजिक संस्था आणि महिला मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.
दिवंगत रावसाहेब पाटील यांच्या निवासस्थानी माजी मंत्री विरकुमार पाटील यांनी भेट देऊन मीनाक्षी पाटील यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी तात्यासाहेब कागले, विनयश्री पाटील, धनश्री पाटील, सहकार रत्न उत्तम पाटील, युवा उद्योजक अभिनंदन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
निपाणी येथील कार्यकर्त्यातर्फे युवा उद्योजक इम्रान मकानदार यांच्या हस्ते मीनाक्षी पाटील यांचा पुरस्काराबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक विनायक वडे, शिरीष कमते, सहकाररत्न उत्तम पाटील, अभिनंदन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कुरली येथील माजी ग्रामपंचायत अध्यक्ष विश्वनाथ उर्फ बंडा पाटील, सिताराम चौगुले, शिवाजी चौगुले यांच्यासह कार्यकर्त्यांनी उत्तम पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन मीनाक्षी पाटील यांचा सत्कार केला. उत्तम पाटील यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून यापुढे काळातही मतदारसंघातील नागरिकांच्या विकासासाठी आपणास व आपले कुटुंब सदैव प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

आप्पाचीवाडी पुलासाठी आरपारची लढाई; रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार

Spread the love  २८ रोजी पाटबंधारेसह तालुका पंचायत कार्यालयाला टाळे ठोकणार निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *