Sunday , July 26 2026
Breaking News

निपाणीत भगवान महावीरांचा जय, जयकार

Spread the love

 

जन्मकल्याणक महोत्सवाला गर्दी ; विविध आकर्षक पालखी मिरवणूक

निपाणी (वार्ता) : जगाला अहिंसा आणि शांतीचा संदेश घेणाऱ्या श्री १००८ भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव येथील दिगंबर जैन समाजातर्फे व्यंकटेश मंदिरात सोमवारी पार पडला. त्यानिमित्त दिवसभर श्रावक -श्राविकांनी महावीरांचा जयघोष केला. जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महोत्सवानिमित्त रविवारी (ता.२९) सायंकाळी सात वाजता गर्वकल्याणक कार्यक्रम पार पडला. सोमवारी (ता.३०) सकाळी ६.३० वाजता आणि ते पूजा, ८.३० वाजता गांधी चौक, रविवार पेठ, चिमगावकर गल्ली, ‌ निराळे गल्ली, प्रभात चित्रमंदिर, दत्त गल्ली, नेहरू चौक, चाटे मार्केट, नगरपालिका कार्यालय, कित्तूर चन्नम्मा सर्कल, गुरुवार पेठमार्गे गांधी चौकापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळेस श्रावक श्राविकांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर व्यंकटेश मंदिरात विविध सवाल झाले. यावेळी पंचामृत पूजा अभिषेक जन्मकल्याणक महोत्सव पाळणा झाल्यानंतर सकाळ जैन समाजातर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
गुरुवारी (ता.९ एप्रिल) नवकार महामंत्र आणि मंदिरामध्ये जप करण्यात येणार आहे. यावेळी श्रावक श्राविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भगवान महावीर जन्म कल्याणात महोत्सव कमिटीने केले आहे. महोत्सवास अध्यक्ष अरुण खोडबोळे, उपाध्यक्ष अमर उत्तुरे, सेक्रेटरी अरुण उपाध्ये, अच्युत अलगुरे, आशिष खोडबोळे, शांतिनाथ मुदकुडे, शांतिनाथ भिकन्नावर, सुनील बल्लोळ, शशीकुमार गोरवाडे यांच्यासह श्रावक- श्राविका उपस्थित होत्या

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *