Monday , September 21 2026
Breaking News

येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून 1 लाख सह्यांच्या मोहिमेला प्रारंभ

Spread the love

 

येळ्ळूर : दीर्घकाल प्रलंबित असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न 2004 साली सर्वोच्च न्यायालयात दाखल केला. आज 22 वर्षे झाली तरी देखील या खटल्यावर सुनावणी होऊ शकली नाही. सदर सुनावणी तात्काळ आणि जलद गतीने करावी, अशी विनंती बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांच्यावतीने करण्यात येणार आहे. 1 लाख सह्यांचे निवेदन सरन्यायाधीशाना सादर करण्यात येणार आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाला पाठिंबा देऊन येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने येळ्ळूर येथे सह्या घेण्याचे काम हाती घेतले आहे. यावेळी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सदर उपक्रमाचे स्वागत करण्यात आले आणि येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी प्रकाश अष्टेकर यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती विशद करून कार्यकर्त्यांनी आजी माजी जिल्हा परीषद सदस्य, तालुका पंचायत सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, विविध सहकारी पतसंस्थाचे प्रतिनिधी, युवक संघटनांचे प्रमुख, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि मराठी भाषिकांच्या भेटी घेऊन सदर मोहिम यशस्वी करावी असे सांगितले.
या मोहिमेत माजी ए पी एम सी सदस्य वामनराव पाटील, दुद्दापा बागेवाडी, राजू पावले, शिवाजीराव सायनेकर, वामन पाटील, दत्ता उघाडे, दुधाप्पा बागेवाडी, सतीश देसुरकर, बंडू मजुकर, कृष्णा शहापूरकर, प्रकाश मालुचे, सुरज गोरल, दयानंद उघाडे, राकेश परीट, नंदकुमार पाटील, नेताजी गोरल, यल्लूप्पा पाटील, बाळू पाटील, गणपत हट्टीकर, कृष्णा बिजगरकर, चंद्रकांत पाटील, आपाजी पुजारी, मनोहर पाटील, महावीर पुजारी आदि बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *