Sunday , July 26 2026
Breaking News

पंचमहाव्रतांचे पालनाने शांतता, सामाजिक सुव्यवस्था

Spread the love

 

सहकाररत्न उत्तम पाटील; बोरगावमध्ये महावीर जयंती

निपाणी (वार्ता) : विश्वशांतीसाठी वाणीची हिंसा टाळून संयम, करुणा आणि अनेकांतवादाचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे.भौतिक सुखांच्या मागे धावणाऱ्या पिढीने परिग्रह, असत्य आणि मायाचार टाळून संयमाचा मार्ग स्वीकारावा. दिन-दुबळ्यांची सेवा, ज्ञानदान आणि रुग्णांन मदत करणे हाच खरा धर्म आहे.जीवनात अहिंसा, सत्य, अचौर्य ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या पंचमहाव्रतांचे पालन केल्यास वैयक्तिक शांतता आणि सामाजिक सुव्यवस्था निर्माण होईल, असा विश्वास सहकाररत्न उत्तम पाटील यांनी व्यक्त केला.
बोरगाव येथे भगवान महावीर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य, दिव्य व आकर्षक मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी,श्रावक-श्राविका, नागरिक, युवक व उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. ढोल-ताशांचा गजर, जयघोष आणि भक्तिमय वातावरणामुळे बोरगाव नगरी भक्तिरंगात न्हाऊन निघाली होती.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *