Monday , September 21 2026
Breaking News

चलवेनहट्टी येथे हुनमान जयंती निमित्त विविध कार्यक्रम

Spread the love

 

 

बेळगाव : चलवेनहट्टी येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. बुधवार दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी मंदिर जागरण होणार असून जागरण निमित्ताने रात्री संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तसेच २ एप्रिल रोजी पहाटे ६-०० वाजता हनुमान जन्मोत्सव साजरा होणार आहे.
यावेळी बाल हनुमान यांना पाळण्यात घालून नामकरण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४-०० वाजता हनुमान जयंतीनिमित्त शोभायात्राचे (बैलगाडेचे) आयोजन करण्यात आले आहे. तसेच श्री क्षेत्र जोतिबा देवस्थानाच्या शासन कठ्याचे (चांगभले) यांचे पुजन होणार आहे.
या शासन काट्यांच्या पुजना नंतर आंबिल घुगऱ्याचा प्रासद वाटप करण्यात येणार आहे. तरी समस्त भाविक नोंद घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *