Sunday , April 5 2026
Breaking News

दोड्डण्णावर हायस्कूलमध्ये ‘गुरुवंदना’ व ‘स्नेहमिलन’ कार्यक्रम संपन्न

Spread the love

 

बेळगाव : हालगा येथील श्रीमती जे. आर. दोड्डण्णावर हायस्कूलच्या 2006-07 या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘गुरुवंदना आणि स्नेह मिलन’ कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. सुमारे 19 वर्षांनंतर एकत्र आलेल्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या गुरुजनांचा सन्मान करून शालेय काळातील आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आगमन केलेल्या निवृत्त व विद्यमान शिक्षकांचे पुष्पवृष्टी करून आनंदोल्हासात स्वागत केले. शालेय दिवसांची आठवण म्हणून त्या काळाप्रमाणे प्रार्थना, नाडगीत आणि राष्ट्रगीत सादर करून शालेय वातावरण निर्माण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भरतेंश शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्रीपाल खेमलापुरे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव श्री विनोद दोड्डण्णावर उपस्थित होते. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रगतीचे कौतुक आपल्या भाषणात केले.
आपल्याला अक्षर ओळख करून देणाऱ्या 20 हून अधिक शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवेची व कार्याची आठवण करून देत भव्य सन्मान करण्यात आला. निवृत्त मुख्याध्यापक बी. एच. बिळगोजी, टी. पी. चौगुले, ए बी सनदी, यांच्यासह अनंत लाड, विद्यमान मुख्याध्यापिका नलिनी आगरे -पाटील व अनेक जेष्ठ शिक्षकांनी या प्रसंगी भावूक होत आपल्या भावना व्यक्त केल्या
याच बॅचमधील गोपीनाथ परंडे, संतोष लोहार, शंकर जंगली, मारुती जंगली आणि अभिनंदन गंडिगवाड हे भारतीय सैन्यात तर संजय कोलकार व सागर मुचंडी हे पोलिस खात्यात कार्यरत असल्याने त्यांचा विशेष सत्कार करून देशप्रेम व्यक्त करण्यात आले.
या वेळी जुन्या विद्यार्थ्यांनी शाळेस एक छोटेखानी देणगीही अर्पण केली.
कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी लहान मुलांकडून भरतनाट्यम सादरीकरण करण्यात आले. दुपारनंतर शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या मनोरंजक खेळांनी सर्वांना पुन्हा बालपणाच्या आठवणीना उजाळा दिला.
अभिषेक देसाई यांनी प्रास्ताविकात शाळेचा इतिहास व शिक्षकांचे योगदान अधोरेखित केले. तेजा हुडेद व पद्मजा पाटील यांनी सत्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रियांका थोरली यांनी आभार मानले. पवनकुमार, भरतेंश, भावकन्ना, नागराज, महावीर कमाल, अक्षय पाटील, गोपीनाथ व संतोष यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची आठवण म्हणून शाळेला 10 कुशन चेअर्स व क्रीडा साहित्य भेट देण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे विद्यमान संचालक धीरज दोड्डण्णावर, बाहुबली कडेमणी, महावीर बेल्लद, अशोक बेल्लद हेही उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावमध्ये मटका अड्ड्यांवर छापे : तिघांना अटक

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात सुरू असलेल्या अवैध मटका व्यवसायावर पोलिसांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *