Monday , September 21 2026
Breaking News

भानामतीच्या भीतीने मुलीला ठेवले साखळीने बांधून

Spread the love

 

कागवाड तालुक्यातील मूळे गावात धक्कादायक घटना
कागवाड : कागवाड तालुक्यातील मूळे गावात अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिद्राय नावाच्या व्यक्तीने आपल्या बुद्धिमंद मुलीला अनेक वर्षे घरात साखळीने बांधून ठेवले, असे समजते.

माहितीनुसार, ही तरुणी दहा वर्षांपूर्वी नियमित कॉलेजला जात होती, परंतु तिच्या विचित्र वर्तनामुळे कुटुंबीयांना भानामतीची भीती वाटू लागली. त्यांनी एका स्वामीजींचा सल्ला घेतला, ज्यांनी भानामती दूर करण्यासाठी मोठा खर्च लागेल असे सांगितले. त्यामुळे उपचार न करता तिला घरात कैद करून ठेवण्यात आले.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, “साखळी काढल्यास ती लोकांवर दगड फेकते किंवा पळून जाते,” म्हणून तिला असे बांधले होते. हा अमानुष प्रकार कागवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून, पोलीस तपास सुरू आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *