
बेळगाव : जुगार मटका आणि गांजा विक्रीचे प्रकार बेळगाव शहरात सुरूच आहेत. त्यामुळे या विरोधात पोलीस सज्ज झाले असून गांजा विक्री करणाऱ्या दोघाना अटक केली आहे. सीसीबीने रविवारी ही कारवाई केली असून त्यांच्याकडून सुमारे तीन लाखाचा गांजा व साहित्य जप्त केले आहेत. या कारवाईने गांजा विक्री करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली आहे.
सीसीबीचे पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील ही कारवाई आहे. त्यांच्याकडून 8 किलो 300 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. याचबरोबर एक गांजा विक्रीसाठी वापरण्यात येणारी मोटरसायकलही जप्त केली आहे. मिरजहून बेळगाव येथे गांजा आणून हे दोघेजण विक्री करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अमन अक्रम जमादार (वय 30, रा. ख्वाजा बस्ती, मिरज, जिल्हा सांगली, महाराष्ट्र), फारुख आलम नमाज खान (वय 37 वर्षे राहणार ख्वाजा बस्ती मिरज सध्या राहणार जुनैदि नगर कुडची, रायबाग) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी गांजा विक्री केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे पाळत ठेवून या दोघा जणांना अटक करण्यात आले आहे.
या दोघांकडून 2 लाख 49 हजार रुपयांचा गांजा आणि पंधरा हजार किमतीची दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. या दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडून विचारणा केली असता दोघेही महाराष्ट्राच्या पंढरपूर आणि विविध भागातून गांजा गोळा करतात आणि तो गांजा आणून बेळगाव विक्री करतात.
बेळगाव येथील मार्गावर गांजा विक्री करत असताना या दोघांना सीसीबीने अटक केली आहे. या कारवाईमुळे पोलीस आयुक्त एम. बी. बोरलींगाया यांनी कारवाईचे समर्थन करत पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta