
बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागाची बैठक मंगळवार दि. ७ एप्रिल रोजी होणार आहे. सायंकाळी ४.३० वाजता शहापूर येथील नाथ पै सर्कल येथील अंबाबाई मंदिरासमोरील श्री साई गणेश सोसायटीच्या सभागृहात बोलाविण्यात आली आहे. या बैठकीस शहापूर विभागातील सर्व सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष नेताजी जाधव यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta