
शिवजयंती उत्सवाच्या तयारीसाठी पोलीस आयुक्तांसोबत मध्यवर्ती मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक
बेळगाव (प्रतिनिधी) : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ, बेळगावच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शहराचे पोलीस आयुक्त श्री. भुषण गुलाबराव बोरसे (IPS) यांची पोलीस आयुक्त कार्यालयात भेट घेऊन येऊ घातलेल्या श्री शिवजयंती उत्सवाच्या तयारीसंदर्भात सविस्तर चर्चा केली.
यावेळी अध्यक्ष अंकुश केसकर यांनी पोलीस आयुक्तांना छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तक भेट दिले. बैठकीत तीन दिवस चालणाऱ्या पारंपारिक शिवजयंती उत्सवाच्या विविध बाबींवर तसेच मंगळवार, २१ तारखेला सायंकाळी होणाऱ्या मिरवणुकीच्या नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली.
पोलिस आयुक्त बोरसे यांनी मिरवणूक वेळेत सुरू करून वेळेत संपवावी, दोन चित्ररथात अंतर असू नये, आवाजाची मर्यादा पाळावी अशा सूचना केल्या तसेच
शुक्रवार दि. १० एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता शहर व उपनगरातील उत्सव मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली असून, त्यामध्ये उत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला जाणार असल्याचे सांगीतले.
या बैठकीस अध्यक्ष अंकुश केसरकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, सल्लागार माजी महापौर मालोजी आष्टेकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, कार्यवाह मदन बामणे व शिवराज पाटील उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta