Monday , May 25 2026
Breaking News

श्री शिवजयंती उत्सवानिमित्त बापट गल्लीतील श्री कालिकादेवी युवक मंडळाची बैठक उत्साहात संपन्न

Spread the love

 

बेळगाव : आगामी पारंपारिक श्री शिवजयंती उत्सवानिमित्त दरवर्षी प्रमाणे श्री कालिकादेवी युवक मंडळ बापट गल्लीची बैठक मंगळवार दिनांक ७ रोजी संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी धनंजय कणबरकर होते. यावेळी १९ एप्रिल रोजी शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात आणि २१ एप्रिल रोजी होणाऱ्या चित्ररथ देखाव्याचे नियोजन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
बैठकीत नवीन पदाधिकारी निवड तसेच चित्ररथ देखावा कोणता करावा याबद्दल सर्वसंमतीने निर्णय घेण्यात आला.
बापट गल्लीतील युवा कार्यकर्ते, मंडळाचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष श्री. अंकुश अरविंद केसरकर यांची नुकतीच मध्यवर्ती श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्त नूतन अध्यक्ष श्री. अंकुश अरविंद केसरकर यांचा मंडळाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून त्यांचा गल्लीतील ज्येष्ठ पंच श्री. गोपाळराव केसरकर यांच्याहस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. गल्लीसाठी आणि मंडळासाठी ही अभिमानाची गोष्ट असताना त्यांच्या या निवडीबद्दल मुद्दामहून संभ्रम निर्माण करणाऱ्या गल्लीतील एका जुन्या कार्यकर्त्याचा सर्वानुमते निषेध नोंदविण्यात आला. ज्या मंडळामुळे हा कार्यकर्ता मोठा झाला आहे आणि ज्या गल्लीमुळे त्याचे बेळगावमध्ये नाव लौकिक झाले. त्या गल्लीला आज प्रातिनिधिक स्वरूपात मानाचे पद मिळाले असताना हा कृतघ्न व्यक्ती गल्लीतील कार्यकर्त्याच्या या निवडीवर नाराजी व्यक्त करून निवडीचा विरोध करतो, ही निंदनीय गोष्ट असून, या व्यक्तीचा गल्लीतील ज्येष्ठ पंच, ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला वर्ग तसेच युवा कार्यकर्त्यांनी या बैठकीत तीव्र शब्दात निषेध केला. आणि येणाऱ्या काळात अंकुश केसरकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला.
यावेळेस गल्लीतील पंचमडळी सुनील केसरकर, महेश पावले, सुनील मुरकुटे, भाऊ किल्लेकर, दिगंबर किल्लेकर, अतुल केसरकर, गजानन निलजकर, शुभम मोरे, अमर खनगावकर, अभिषेक निलजकर, नरू निलजकर तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या श्रीराम कथेचे दि. 2 जून पासून बेळगावात आयोजन

Spread the love  बेळगाव : आंतरराष्ट्रीय व्याख्याते, प्रवचनकार आणि साहित्यिक असलेल्या डॉ. सच्चिदानंद शेवडे यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *