Sunday , September 8 2024
Breaking News

जायंट्स भवनामुळे माझ्या वडिलांचे स्वप्न साकार : शायना एन. सी.

Spread the love


बेळगाव : ’जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनने विविध उपक्रम बरोबरच आता जायंट्स भवनाची उभारणी करून भव्य असे कार्य केले आहे. हे भवन कायम कार्यकर्त्यांना प्रेरणा देत राहील. हे भवन उभारल्यामुळे माझे वडील आणि जायंट्स संघटनेचे संस्थापक नाना चुडासमा यांचे स्वप्न साकार झाले आहे. याबद्दल बेळगाव जायंट्सचे मी विशेष कौतुक करते आणि या उपक्रमासाठी एक लाख रुपयांची देणगी जाहीर करते’ असे विचार जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन या जागतिक संघटनेच्या जागतिक अध्यक्षा शायना एन. सी. यांनी बोलताना व्यक्त केले.
सुमारे 40 लाख रुपये खर्चून कपिलेश्वर मंदिरासमोर उभारण्यात आलेल्या जायंट्स भवनाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सोशल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष पी. आर. कदम हे होते. जायंट्स सभासदांनी रुपये 5000 पासून साडे चार लाखापर्यंतच्या देणग्या देऊन हे भवन बांधले आहे, अशी माहिती सोशल वेल्फेअर असोसिएशनचे सेक्रेटरी शिवराज पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. संस्थेच्या कार्याचा आढावा मोहन कारेकर यांनी घेतला. सखीच्या सदस्यांनी जायंट्स प्रार्थना म्हटल्यावर शायना एन. सी. व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. शायना एन. सी. यांचा परिचय मदन बामणे यांनी तर सत्कार सत्कार जायंट्स सखीच्या अध्यक्षा नीता पाटील यांनी केला.
आमदार अनिल बेनके यांचा सत्कार सोशल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष पी. आर. कदम यांनी केला. प्रमुख देणगीदार सूर्यकांत पवार आणि बंधू यांचा सत्कार संजय पाटील यांनी तर तारादेवी वाली यांचा सत्कार फेडरेशन संचालिका ज्योती अनगोळकर यांनी केला. विविध देणगीदारांना पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना अनिल बेनके यांनी बेळगावच्या पुण्यभूमिचे कौतुक करीत जायंट्स या संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.

’बेळगाव जायंट्सने नेहमीच कौतुकास्पद कार्य केले आहे. त्यांनी हाती घेतलेले सर्व उपक्रम पूर्णत्वास नेऊन आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे ही खरोखर कौतुकास्पद बाब आहे. मोहन कारेकर व त्यांच्या सहकार्‍यांनी वाखानण्याजोगे कार्य केले आहे असे त्या म्हणाल्या.
शायना एन. सी. व आमदार बेनके यांच्या हस्ते जायंट्स भवनातील विविध दालनांची उद्घाटन करण्यात आले. माजी अध्यक्ष अनंत लाड यांनी सूत्रसंचालन केले तर प्रेमानंद गुरव यांनी आभार प्रदर्शन केले.
गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक राजेंद्र कलघटगी यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *