Friday , March 6 2026
Breaking News

पोलिसांसाठी 20 हजार घरे बांधणार: गृहमंत्री

Spread the love


बेळगाव : कर्नाटक पोलीस राज्यात सर्वोत्कृष्ट सेवा देत आहेत. पोलिस कर्मचार्‍यांना सुखा समाधानाने राहता यावे यासाठी 20 हजार नवी प्रशस्त घरे बांधण्याची योजना सुरू आहे. यामधील 10 हजार घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी दिली आहे.
बेळगाव येथील केएसआरपी पोलीस कॉन्स्टेबल प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या चौथ्या पथकाचे पासिंग परेड सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना ज्ञानेंद्र म्हणाले, आपल्या देशातील पोलीस दल शिस्त आणि प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत आहेत. सामाजिक शांतता, सुव्यवस्था राखण्याचे महत्त्वाचे काम पोलीस करत आहेत. कर्नाटक पोलीस देशात चांगली सेवा करत आहे.
निवडणुकीदरम्यान आणि शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस विभागाचे शौर्य, धैर्य आणि चांगले कौशल्य दाखवणे हा आमचा अभिमान आहे. पोलीस खाते देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे.
पोलीस ठाण्यांचा दर्जा सुधारण्यात आला आहे. ते म्हणाले की, 200 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले असून 100 पोलीस स्थानके सर्वोच्च स्तरावर बांधण्यात आली आहेत. असेही गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी स्पष्ट केले.

 

About Belgaum Varta

Check Also

राज्याचा अर्थसंकल्प जनतेची दिशाभूल करणारा : भाजप महिला मोर्चा सचिव डॉ. सोनाली सरनोबत

Spread the love  बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सादर केलेला कर्नाटक राज्याचा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *