बेळगाव : विविध कलाकारांनी मिळून बेळगाव येथील कन्नड साहित्य भवन येथे जागतिक कला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटक ललित कला अकादमीचे जयानंद मादार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
नियती फौंडेशनच्या अध्यक्षा सोनाली सरनोबत, कन्नड आणि संस्कृती खात्याच्या विद्यावती बजंत्री, ज्येष्ठ कलाकार बी. ए. पत्तार, बाळू सदलगी व्यासपीठावर होते.
यावेळी महेश होनुले, डॉ. सोनाली सरनोबत, विठ्ठल बडीगेर, अप्पू कांबळी, संजयकुमार हुल्लेनावर या सर्वांचा कला क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. सोनाली समीर सरनोबत म्हणाल्या, जीवनातील सौंदर्य बाहेर आणण्यासाठी कलाकार हे स्वतःच देव असतात. सर्वांनी कॅनव्हासवर व्यक्त होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. जयानंद मादार यांनी जागतिक कला दिनाचे महत्व पटवून सांगितले.
Check Also
भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना
Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …