Tuesday , March 3 2026
Breaking News

गर्लगुंजी मराठी मुलांच्या शाळेवर झाड कोसळून इमारतीचे नुकसान

Spread the love


खानापूर (प्रतिनिधी) : शनिवारी दि. १६ रोजी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेच्या इमारतीवर झाडांच्या फांद्या कोसळल्याने शाळेच्या प्रार्थना हाॅलचे संपूर्ण छप्पर मोडून जमिनदोस्त झाले. सुदैवाने शाळाना उन्हाळी सुट्टी असल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र कौलारू इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गर्लगुंजी उच्च प्राथमिक मराठी मुलांची कौलारू शाळेची इमारत जवळपास नऊ खोल्यांची होती. अंदाजे १९६५ साली इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. त्याकाळी कौलारू छप्परची इमारत व दगडी बांधकाम इमारत करण्यात आले होते. त्यामुळे इतक्या वर्षाच्या इमारतीच्या कौलारू छप्पर मजबूत होते. दगडी इमारतीच्या काही भिंतीना तडे गेले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना या इमारतीत बसण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. परंतु शनिवारी दि. १६ रोजी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने झाडांच्या फांद्या शाळेच्या कौलारू इमारतीवर पडल्याने छप्पर कोसळून जमिनदोस्त झाले.
घटनास्थळी शाळेचे मुख्याध्यापक संतोष चोपडे, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्यांनी तसेच गावच्या शिक्षणप्रेमीनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
तेव्हा धोक्याची इमारत पाहता शाळा इमारतीचे जीर्णोद्धार करणे काळाची गरज आहे, अशी मागणी गर्लगुंजी ग्रामस्थातून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *