
बेळगाव : धर्मवीर संभाजी नगर वडगाव येथील श्री गणेश व मारूती मंदिर सांस्कृतिक ट्रस्ट, धर्मवीर संभाजी युवक मंडळ आणि महिला मंडळाच्यावतीने श्री हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी 6.30 वा. जन्मोत्सव व पूजाअर्चा करण्यात आली. राजेंद्र कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले. त्यानंतर सामूहिक हनुमान चालिसा पठन करुन प्रसाद वाटप करण्यात आले.
श्री गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मारुती जायाण्णाचे, उपाध्यक्ष भाऊराव पाटील, परशराम नावगेकर, नारायण केसरकर, श्रीधर जाधव, प्रदीप शट्टिबाचे, गोकुळ अकनोजी, महादेव मोरे, युवक मंडळाचे अध्यक्ष प्रसाद यळ्ळूरकर, कार्याध्यक्ष विनायक मोरे, सूरज पाटील, अभिजित केसरकर, चेतन केसरकर, ॐकार कदम, संकेत सांबरेकर, धोंडिबा मोहिते, अमित सैनुचे, परशराम बगाडे, करवीर भंडारी परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळे, युवा कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta