Friday , October 18 2024
Breaking News

हरी बोल गजरात, बेळगावात आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाच्या हरेकृष्ण रथयात्रेला प्रारंभ

Spread the love

बेळगाव :  दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे काढली जाणारी राधा कृष्ण, गौर निताय हरेकृष्ण रथयात्रेला आज रविवारी सकाळी मोठ्या भक्तिभावात सुरुवात झाली आहे. हरीबोल गजरात निघालेल्या रथयात्रेत हजारो कृष्णभक्त सहभागी झाले आहेत त्याचबरोबर श्रीकृष्ण जीवनावर आधारित चित्ररथ रथयात्रेच्या आकर्षण ठरले आहे.
बॅरिस्टर नाथ पै चौक शहापूर येथून रथयात्रेला प्रारंभ झाला. सुरुवातीला आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाचे बेळगाव प्रमुख श्री रसामृत प्रभू स्वामी यांच्या हस्ते श्री जगन्नाथ, श्री बलराम आणि सुभद्रा मातेचे पूजन करण्यात आले. सामूहिक आरतीचा कार्यक्रम आहे झाला. मान्यवरांच्या हस्ते रस्त्याची सफाई आणि रत उडून रथयात्रेला शुभारंभ करण्यात आला.
रथयात्रेच्या अग्रस्थानी बैलगाड्या, भगवान श्री कृष्णांच्या जीवनावरील काही देखावे, लेझीम ,भजनी मंडळ, भजन, किर्तन करणाऱ्या भक्तांचा समूह आणि रथयात्रेचे समोर प्रभुपाद यांची प्रतिमा असलेली बग्गि यांचा समावेश होता. संपूर्ण मार्गावर इस्कॉनच्या सेवेकरी युतीने आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या. वाटेत प्रसाद पाकिटांचे वितरण करण्यात येत आहे. रथमार्गावर भक्त समूहाकडून रथावर पुष्पवृष्टी करण्यात येत आहे.


बॅरिस्टर नाथ पै चौक येथून सुरू झालेली रथयात्रा पुढे खडेबाजार शहापूरमार्गे, बँक ऑफ इंडिया पर्यंत जाऊन रथयात्रा महात्मा फुले रोड मार्गे गोवावेस कडून इस्कॉन मंदिरात पोहचणार आहे. तेथे विविध कार्यक्रम होऊन यात्रेची सांगता होईल.
श्री राधा गोकुलानंद मंदिराजवळ रथयात्रा पोहोचल्यानंतर भक्ती रसामृत स्वामी महाराज यांचे प्रवचन होईल. पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन मंडपातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. याठिकाणी उपस्थित भक्तांना प्रसाद पाकिटांचे वितरण करण्यात येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *