येळ्ळूर : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती खानापूर यांच्यावतीने भारताचे पंतप्रधान यांना सीमावासीयाच्यावतीने सीमाप्रश्न सोडवणूक करावी असा मजकूर लिहून पत्र पाठविण्याचे ठरविण्यात आले होते. त्यांना पाठिंबा देत येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आव्हान केल्यानंतर येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आज प्रत्येक गल्लीतील नागरिकांनी पत्रे लिहून आजपर्यत 2150 पत्रे समितीकडे सोपविली आहेत. येळ्ळूर विभाग समितीचीचा 3000 ते 3500 पत्रे लिहून पाठवायचा उपक्रम घेतला होता. आज सोमवार दिनांक 9 रोजी सकाळी श्री चांगळेश्वरी मंदिर येथे कार्यक्रम सपंन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शांताराम कुगजी होते. प्रास्तविक सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर यांनी केले. माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, येळ्ळूर गावचा सीमाप्रश्नासाठी फार मोठा त्याग आहे. येळ्ळूरच्या लढवय्या जनतेने सीमासत्याग्रह केला. महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक लावला व या सरकारणे काढून टाकला पण येळ्ळूरच्या प्रत्येक मानसाच्या हृदयात महाराष्ट्र राज्य येळ्ळूर असे कोरलेच आहे. आज अनेक पत्रे लिहून आपली भावना व्यक्त केली आहे. आमचा जिव्हाळ्याचा सीमाप्रश्न आम्ही सोडवून घेऊच असे आव्हान केले.
श्री. दीपक दळवी म्हणाले, आज येळ्ळूरमधील हजारो पत्राची दखल देशाचे पंतप्रधान नक्कीच घेतील. हा लढा आम्ही सीमाप्रश्न सुटेपर्यत चालूच ठेऊ व सीमाप्रश्न सोडवून घेऊ.
त्यानंतर पोष्ट ऑफिसमध्ये जाऊन सर्वांच्यावतीने पत्रे दाखल करण्यात आली. या कार्यक्रमाला येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे ग्राम पंचायत अध्यक्ष श्री. सतीश पाटील, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. दीपक दळवी, कार्याध्यक्ष श्री. मनोहर किणेकर, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते श्री. प्रकाश मरगाळे, तालुका पंचायत सदस्य श्री. रावजी पाटील. एपीएमसी सदस्य श्री. महेश जुवेकर, युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलीक, गणेश दड्डीकर, एल. आय. पाटील, विलास घाडी, दत्ता उघाडे, उदय जाधव, वामन पाटील, ग्राम पंचायत उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, सदस्य रूपा पुण्याणावर, मनिषा घाडी, शालन पाटील, सुवर्णा बिजगरकर, वनिता परिट, रमेश मेणसे, राकेश परिट, प्रमोद पाटील, राजू डोण्याणावर, जोतिबा चौगुले, राकेश परिट, माजी ग्राम पंचायत सदस्य राजु पावले, सतिश देसुरकर, भोला पाखरे, अनंत पाटील, शिवाजी कदम, वाय. सी. इंगळे, प्रकाश घाडी, नारायण कानशिंडे, गजानन उघाडे, रमेश पाटील, कृष्णा शाहपूरकर, रामदास धुळजी अनंद मजुकर, तुकाराम टक्केकर, चंद्रकांत पाटील, बाळकृष्ण पाटील, सुरेश पाटील, अनिकेत पाटील, हेमंत पाटील, विठ्ठल पाटील, गजानन पाटील, आशोक भातकाडे, विनोद पाटील, हणमंत पाटील, अनिल मुरकुटे, सुभाष पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार महाराष्ट्र एकीकरण समिती येळ्ळूर विभाग कार्याध्यक्ष श्री. दुधाप्पा बागेवाडी यांनी मानले.
Check Also
बेळगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे संस्थेचा 25 वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न
Spread the love पुणे : बेळगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे या संस्थेचा 25 वा …